रिफ्लेक्स २ के २३ स्पर्धा उत्साहात

रिफ्लेक्स २ के २३ स्पर्धा उत्साहात

01994
--------
रिफ्लेक्स २ के २३ स्पर्धा उत्साहात
अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनतर्फे आयोजन; ९७६ विद्यार्थी सहभागी
पेठवडगाव, ता. ८ : वाठार तर्फ वडगाव येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये ‘रिफ्लेक्स २ के २३’ या राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली. अभियांत्रिकी व व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान व कौशल्य सिद्ध करण्याची संधी देण्यासाठी स्पर्धा घेतल्या. स्पर्धेत विविध इंजिनिअरिंग व एमबीए अभ्यासक्रमाचे ९७६ विद्यार्थींनी भाग घेतला.
स्पर्धेअंतर्गत सिव्हील विभागातर्फे प्लॅन मास्टर, मेकॅनिकलतर्फे कॅड मास्टर, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगतर्फे कोड मास्टर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे इलेक्ट्रोटेक ट्रेजर हंट, इलेक्ट्रिकल विभागातर्फे सर्किट टेक्नॉटेक, ॲप्लाइड सायन्स अँड ह्युमॅनिटीज विभागातर्फे प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी क्वीझ कॉम्पिटीशन, एमबीए विभागातर्फे मास्टर माईंड्स, तसेच सर्व विभागांतर्गत प्रोजेक्ट कॉम्पिटिशन व इंटर्नशिप/फिल्ड ट्रेनिंग प्रेसेंटेशन स्पर्धांचा समावेश होता.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण मयुरा स्टील्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक रवी डोली यांच्याहस्ते झाले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. एच. टी. जाधव, अॅकॅडमीक डीन प्रा. पी. बी. घेवारी प्रमुख उपस्थित होते. रवी डोली यांनी मनोगत व्यक्त केले. प्रत्येक विभागामध्ये पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना रुपये एक लाखापर्यंतची रोख बक्षीसे व पारितोषिके देऊन गौरवले. डॉ. एच. व्ही. शेटे, प्रा. आर. एस. पाटील, स्पर्धा समन्वयक व स्टुडंट अफेअर्स डीन प्रा. जे. एम. शिंदे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल असा- इलेक्ट्रोटेक ट्रेजर हंट - प्रथम-समर्थ पाटील, प्रत्यय पाटील, अंकिता दरेकर, द्वितीय - आदिती पाटील, गीता जगताप, अंजली पाटील, तृतीय - आरती साळुंखे, प्राची यादव, दीक्षा माने (अशोकराव माने इन्स्टिट्यूट).
कॅड मास्टर- प्रथम - सुमित साखरे, द्वितीय - निखिल पाटील, तृतीय - श्रेयस पाटील (अशोकराव माने इन्स्टिट्यूट).
सर्किट टेक्नोटेक - प्रथम - सत्यम वरेकर, शुभम मोहिते, द्वितीय - संकल्प सोकसाने, संकेत जलोन (अशोकराव माने इन्स्टिट्यूट), तृतीय - अभिजीत मिठारी, अनिकेत पाटील (संजीवन,पन्हाळा)
प्लॅन मास्टर-प्रथम-विनायक महात्मे (एसआयटी,यड्राव), द्वितीय-जहिद सुतार(अशोकराव माने इन्स्टिट्यूट), तृतीय- सुयश थोरात (डीवायपी, कसबा बावडा).
कोड मास्टर - प्रथम - प्रथमेश पाटील, पुरुषोत्तम राजपुरोहित (डीकेटीई), द्वितीय - प्रितेश पाटील, विनायक पवार (टीकेआयईटी), तृतीय- आयुष कदम (केआयटी).
क्वीझ कॉम्पिटीशन - प्रथम - संकल्प सोकसाने, सोहम यादव, द्वितीय- सचिन राऊत, तृतीय - गायत्री पाटील, प्रियांका चव्हाण (अशोकराव माने इन्स्टिट्यूट).
मास्टर माइंड्स- प्रथम- अंकुर पुदाळे (टीकेआयईटी, वारणा), द्वितीय - इंद्रनील भोसले (राजाराम कॉलेज),
प्रोजेक्ट कॉम्पिटिशन - मेकॅनिकल - गिरीश वानाडकर व ग्रुप (अशोकराव माने इन्स्टिट्यूट), इलेक्ट्रिकल- मोहन तावडे व ग्रुप (अशोकराव माने इन्स्टिट्यूट), ईटीसी- अभिजीत सहारे व ग्रुप (केआयटी), सिव्हील- स्वरूप देसाई व ग्रुप (अशोकराव माने इन्स्टिट्यूट), कॉम्प्युटर सायन्स-राहुल देशमुख व ग्रुप (अशोकराव माने इन्स्टिट्यूट), एमबीए - प्रमोद पाटील (अशोकराव माने इन्स्टिट्यूट).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com