बाचणीचे जय हनुमान मंडळ विजेते

बाचणीचे जय हनुमान मंडळ विजेते

02004
-------
बाचणीचे जय हनुमान मंडळ विजेते
गुलाबराव पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; सडोली खालसाचा मावळा संघ द्वितीय
पेठवडगाव, ता. १२ : माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ७० किलो वजनी गटाखालील मॅटवरील कबड्डी स्पर्धेत बाचणीच्या जय हनुमान क्रीडा मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला. विजयी संघास अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, माजी खासदार राजु शेट्टी, जयंतराव आसगावकर, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, विद्या पोळ यांच्याहस्ते बक्षिस दिले.
स्पर्धा महालक्ष्मी क्रीडा मंडळातर्फे घेतल्या. द्वितीय क्रमांक सडोली खालसाच्या मावळा संघाने, तृतीय क्रमांक तळसंदेच्या राष्ट्रसेवक संघाने तर चतुर्थ क्रमांक पुलाची शिरोलीच्या छावा क्रीडा मंडळाने मिळवला. विजेत्यांना अनुक्रमे पंचवीस, वीस, पंधरा व दहा हजार रुपये व चषक देऊन गौरवले. स्पर्धेचे उद्‍घाटन माजी नगराध्यक्षा विद्या पोळ यांच्याहस्ते झाले. विशेष प्रविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना माजी नगरसेवक संदीप पाटील, राजवर्धन पाटील, नितिन दिंडे, शितल कोळी, प्रवीण पाटील, योगेश चव्हाण, जवाहर सलगर, अभिजीत गायकवाड यांच्याहस्ते बक्षिस दिले.
अष्टपैलू खेळाडू म्हणून निखिल जाधव (बाचणी), उत्कृष्ट चढाई प्रसाद कुंभार (सडोली मावळा) व उत्कृष्ट पकड गौरव पोर्लेकर (छावा शिरोली) यांना सन्मानित केले. खेळाडूंना एलईडी टीव्ही व चषक प्रदान केला. वाढदिवसानिमित्त दोन दिवस कबड्डी स्पर्धा झाल्या. स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील चाळीस संघांनी भाग घेतला होता. पंच म्हणून अजित पाटील, कुबेर पाटील, संभाजी गावडे, दत्तात्रय पाटील, युवराज गावडे, संग्राम रुईकर, अविनाश निकम, अभिजीत पाटणे, संतोष घाटगे, उध्दव खांडेकर यांनी काम पाहिले. सुनील हुक्केरी, संजय सुर्यवंशी, अमोल हुक्केरी, विलास सणगर, रणजीतसिंह यादव, राजेंद्र देवस्थळी, आप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होते. प्रशांत भोरे यांनी सुत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com