माने पॉलिटेक्निकच्या २२९ विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माने पॉलिटेक्निकच्या २२९ विद्यार्थ्यांची निवड
माने पॉलिटेक्निकच्या २२९ विद्यार्थ्यांची निवड

माने पॉलिटेक्निकच्या २२९ विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

02012

माने पॉलिटेक्निकच्या २२९ विद्यार्थ्यांची निवड

पेठवडगाव, ता. १७ : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील अशोकराव माने पॉलिटेक्निकमध्ये चालूवर्षी झालेल्या पूल कॅम्पस प्लेसमेंटमधून ४२३ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. त्यापैकी सर्वाधिक २२९ विद्यार्थी अशोकराव माने पॉलिटेक्निकचे आहेत. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही बहुराष्ट्रीय कंपन्यात औद्योगिक क्षेत्राला गरज असणारे उत्कृष्ट व कुशल अभियंते घडवण्यात माने पॉलिटेक्निक आघाडीवर राहिल्याची माहिती संस्थाध्यक्ष व केडीसीसी संचालक विजयसिंह माने यांनी दिली.
चालू वर्षी झालेल्या निवडीसाठी कमिन्स इंडिया, जॉन डियर, बजाज ऑटो, यझाकी, केएसपीजी ऑटोमोटिव्ह, नॉफ सिलिंग, कोलब्रो ग्रुप, सुजलॉन एनर्जी या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अशोकराव माने पॉलिटेक्निकला पहिली पसंती दिली. पॉलिटेक्निकमधील मेकॅनिकल ५२, इलेक्ट्रिकल ६२, सिव्हिल १३, कॉम्प्युटर ४२, इलेक्ट्रॉनिक्स १६ व ऑटोमोबाईल विभागाच्या ३९ अशा एकूण २२९ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती पॉलिटेक्निकचे प्राचार्य वाय. आर. गुरव यांनी दिली. प्राचार्य वाय. आर. गुरव, टीपीओ एफ. बी. अमिन, विभागप्रमुख पी. टी. हसबे, एस. ए. लकडे, एस. एन. यादव, बी. व्ही. कुंभार, एस. एफ. अमीन, पी. एम. पाटील, अमोल भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.