मिणचे, टोपमधील दोघे
तरुण व्यावसायिक ठार

मिणचे, टोपमधील दोघे तरुण व्यावसायिक ठार

फोटोनं.१ PTV23B02018
02018
घुणकी ः महामार्गावर घुणकी फाट्याजवळ शनिवारी सकाळी मोटारीच्या धडकेने रोडरोलर उलटून पडला, तर मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

फाटोनं.२ PTV23B02019
02019
मृत राहुल शिखरे, सुयोग पवार (मृत)

मिणचे, टोपमधील दोघे
तरुण व्यावसायिक ठार
रोडरोलरला मोटारीची धडक; चौघे जखमी
सकाळ वृत्तसेवा
पेठवडगाव, ता.२७ : मुंबईहून प्रदर्शन बघून परतताना मोटारीने पाठमोऱ्या रोडरोलरला जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण ठार झाले, तर चौघे गंभीर जखमी झाले. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाका व घुणकी फाट्यादरम्यान सकाळी साडेसहाच्या सुमारास अपघात झाला. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. राहुल अशोक शिखरे (वय ३०, रा. मिणचे) व सुयोग दत्तात्रय पवार (२८, रा. टोप) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. सुनील कुरणे (२४), वैभव चौगुले (२३, सर्व टोप) तर अनिकेत जाधव (२२), निखिल शिखरे (२७, रा. मिणचे) जखमी आहेत.
टोप, शिये व मिणचे येथील तरुण प्रदर्शन बघण्यासाठी मुंबईला गेले होते. तेथून रात्री अकराच्या दरम्यान ते मोटारी (एमएच. ४८ ए के ६५४५) ने घरी परत येत होते. त्यांच्यासोबत आणखी एक गाडी होती. सकाळी साडेसहाच्या दरम्यान घुणकी फाट्याजवळ किणी टोल नाक्याच्या दिशेने चाललेल्या रोडरोलरला मोटारीने पाठीमागून जोराची धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की रोडरोलर बाजू रस्त्यावर उलटला. मोटारीच्या पुढील भाग चक्काचूर होऊन तोंड उलट दिशेने झाले. धडक होताच मोठा आवाज झाला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तसेच महामार्गावरील प्रवाशांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्तांचे बचावासाठी ओरडणे अंगावर शहारे आणणारे होते. गंभीर जखमींना तातडीने नाणीज मठाच्या रुग्णवाहिकेतून कोल्हापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. रोलरचालक दादासो दबडे (४०, रा. वाठार) जखमी झाले. त्यांनाही हायवे पेट्रोलिंगच्या रुग्णवाहिकेतून दाखल केले. रुग्णालयात आणलेल्या सुयोग पवार व राहुल शिखरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निखिल शिखरे याच्या डोक्यास गंभीर इजा झाली आहे. अनिकेत जाधव यांचा पायास गंभीर इजा आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सहा पदरी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे सेवा रस्ता बंद आहे. अपघातामुळे वाहतूक पूर्ण ठप्प झाली. पोलिसांनी प्रयत्नपूर्वक वाहतूक सुरळीत केली.

सर्व तरुण व्यवसाय बंधू
मोटारीतील सर्वच तरुण व्यवसाय बंधू आहेत. त्यांचा डॉल्बी, लेसर लाईट भाडेत तत्वावर देण्याचा व्यवसाय आहे. या डॉल्बी, लेसर शोचे प्रदर्शन मुंबईला होते. ते पाहण्याासाठी सर्वजण बुधवारी गेले होते. तेथून परतताना गावाजवळ त्यांच्यावर काळाने घाला आला. सर्वच वीस ते तीस दरम्यानचे कर्ते असल्यामुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com