कोतोलीच्या मुलांची राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोतोलीच्या मुलांची राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड
कोतोलीच्या मुलांची राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड

कोतोलीच्या मुलांची राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

03337
कोतोली ः विजेत्या खेळाडूंसमवेत प्रशिक्षक.

राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी
कोतोलीच्या मुलांची निवड

पुनाळ, ता. ५ : कोल्हापूर जिल्हा ज्युदो असोसिएशतर्फे ४९ वी राज्यस्तरीय व कॅडेड निवड चाचणी शाहू ब्लड बँकेत झाली. यामध्ये छत्रपती ज्युदो प्रशिक्षण केंद्र, कोतोलीतील मुलांनी यश मिळविले. सबज्युनियर गटात श्रेयश बाऊचकर याने ३५ किलो गटात सुवर्णपदक, श्वेता गंधवाले हिने खुल्या गटात सुवर्णपदक मिळवले. कॅडेडमध्ये साक्षी पाटील हिने ४० किलो गटात सुवर्णपदक व संस्कार जाधवने ६५ किलो गटात सुवर्णपदक मिळवले. सर्वांची धुळेतील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. दहा वर्षाखालील सर्वेश जाधवने २५ किलो गटात सुवर्ण, विराज पाटील याने २० किलो गटात सुवर्ण, सोनल जाधव २४ किलो सुवर्ण, धनश्री पोवार हिने २८ किलो गटामध्ये कांस्यपदक मिळवले. बारा वर्षाखालील वेदिका माने २० किलो गटात सुवर्ण, वेदांत जाधव ४० किलो सुवर्ण, धवलराज पाटील ३० किलो सुवर्ण, देवयानी बाऊचकर २९ किलो रौप्य, चिन्मय माने ४५ किलो रौप्यपदक मिळवले. १४ वर्षाखालील ॠतुजा पाटील २८ किलो रौप्य, सुरज पाटील ४५ किलो रौप्य, सिद्धेश शेलार ३५ किलो रौप्य, संस्कृती दाबाडेने खुल्या गटात कास्यपदक मिळवले. विजेत्यांना प्रशिक्षक श्रीकांत पाटील, अरुण पाटील, डाॅ.सचिन पाटील, डाॅ. प्रवीण घुगरे, संजय जाधव, सुरेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.