पुनाळ परिसरात भात कापणीची लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनाळ परिसरात भात कापणीची लगबग
पुनाळ परिसरात भात कापणीची लगबग

पुनाळ परिसरात भात कापणीची लगबग

sakal_logo
By

03367
पुनाळ ः भात कापणी व झोडपणी करताना शेतकरी.

पुनाळ परिसरात भात कापणीची लगबग
पुनाळ : येथील परीसरात पावसाळी भात कापणीची लगबग सुरू आहे. परतीच्या पावसाने अडथळा आलेल्या कामांना पाऊस थांबल्याने गती मिळाली आहे. कसबा ठाणे, महाडिकवाडी, म्हाळुंगे, पुशिरे, पुनाळ, माजनाळ, काटेभोगाव, कुंभारवाडी परिसरात भात कापणी, झोडपणी जोमाने सुरू आहे. भात, भुईमूग, नाचणी पिकांची काढणी सुरु आहे. जूनमधील पावसाने भात पिकाची उगवण चांगली झाली. त्यानंतर पावसाने महिनाभर थंडी मारल्याने भात पिकाचे नुकसान झाले. अखेरच्या टप्प्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने भात पिकाच्या उत्पादनात कमालीची घट दिसत आहे. कमी कालावधीचे, अधिक उत्पादन देणाऱ्या भात वाणांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. प्रत्येक कुटुंबाची कामाची धांदल असल्याने मजूर मिळेनात. त्यामुळे शेतकरी कुटुंबासह मित्रमंडळी व नातेवाईकांच्या मदतीने पिकांची काढणी करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान व मळणीऐवजी खाटल्यावर भात झोडपणीस शेतकरी पसंती देत आहेत.