निधन वृत्त - हौसाबाई सुतार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त  -  हौसाबाई  सुतार
निधन वृत्त - हौसाबाई सुतार

निधन वृत्त - हौसाबाई सुतार

sakal_logo
By

03372
हौसाबाई सुतार
पुनाळ : वाघवे (ता. पन्हाळा) येथील हौसाबाई दौलू सुतार (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

०१३८६
शालाबाई पाटील
पोर्ले तर्फ ठाणे ः येथील श्रीमती शालाबाई सखाराम पाटील (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीराम सेवा संस्थेचे संचालक भरत पाटील यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १६) आहे.

२८८५
मारुती बेलेकर
शाहूनगर ः भाेगावती (ता. करवीर) येथील मारुती गंगाराम बेलेकर (वय ८६) यांचे निधन झाले. ते भोगावती साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी होत.

४३५४
शांताबाई गायकवाड
कागल : हंचिनाळ केएस (ता. निपाणी) येथील शांताबाई तुकाराम गायकवाड (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. सर पिराजीराव प्राथ. पतपेढीचे विद्यमान संचालक व सुळकूड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंदा गायकवाड यांच्या त्या आई होत.

१८१५
शिवराम पाटील
कसबा तारळे : आवळी खुर्द (ता. राधानगरी) येथील शिवराम दौलू पाटील (वय ७६) यांचे निधन झाले. येथील श्री विठ्ठलाई शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संचालक होत. एसटी वाहक राजेश पाटील यांचे वडील व भोगावती कारखान्याचे माजी संचालक अमरसिंह पाटील यांचे ते बंधू होत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १६) आहे.

62295
शेवंता सुतार
गडहिंग्लज : येथील प्रतापराव गुजर वसाहतमधील श्रीमती शेवंता निवृत्ती सुतार (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. हातगाडी खोका संघटनेचे बाळू सुतार य़ांच्या आई तर फुटबॉलपटू ओमकार सुतार यांच्या त्या आजी होत.

०१५७१
विश्वास अनुसे
रूकडी : मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथील विश्वास बिरू अनुसे (वय 82) यांचे निधन झाले. ते श्री पांडुरंग विविध कार्यकारी सोसायटी, मुडशिंगीचे माजी चेअरमन मारुती कोंडीबा अनुसे यांचे चुलते होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

62359
महादेव पाटील
कोल्हापूर : हसूर दुमाला (ता. करवीर) येथील महादेव विष्णू पाटील (वय 59) यांचे निधन झाले. आमदार श्रीमती जयश्री जाधव यांचे स्वीय सहाय्यक रोहित पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. 16) आहे.

62362
दिनकर वालावलकर
कोल्हापूर : कळंबा, चव्हाण कॉलनीतील दिनकर बाळकृष्ण वालावलकर (वय ७६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १६) आहे.

62363
बाळू अवघडे
कोल्हापूर : गडमुडशिंगीतील बाळू जिवबा अवघडे (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, भावजय, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

०४२६५
बसवेश्वर कोरे
जयसिंगपूर : शाहूनगरमधील बसवेश्वर आप्पासो कोरे (वय ६५) यांचे निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते अण्णा कोरे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

1573
जयसिंगराव शिंदे
रूकडी : मुडशिंगी (ता हातकणंगले) येथील जयसिंगराव रामराव शिंदे (वय ७०) यांचे सोमवारी (ता. १४) निधन झाले. पोलिसपाटील परिक्षित शिंदे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १६) आहे.


62379
रत्नमाला मरिगुद्दी
गडहिंग्लज : हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील निवृत्त शिक्षिका रत्नमाला सदाशिव मरिगुद्दी (वय 83) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

०२४४८
धैर्यसिंह रणनवरे
सिद्धनेर्ली ः शेंडूर (ता. कागल) येथील धैर्यसिंह पांडुरंगराव रणनवरे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षविसर्जन बुधवारी (ता. १६) आहे.

१५७५
बाबूराव स्वामी
रूकडी : चोकाक (ता. हातकणंगले) येथील बाबूराव आण्णय्या स्वामी (वय ८९) यांचे सोमवारी (ता. १४) निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १६) आहे.