
कोतोलीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व मिरवणूक.
०३४२२
कोतोली ः यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मुख्याध्यापिका वर्षा गायकवाड, सचिव युवराज गायकवाड आदी.
कोतोलीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
पुनाळ : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या पी. एम. यंग ॲचिव्हर्सअंतर्गत राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नववी व अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४०० गुणांच्या झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोतोली (ता.पन्हाळा) येथील बाबासाहेब पाटील हायस्कूलचे सतरा विद्यार्थी चमकले. १२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख तर अकरावीतील पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी अडीच लाख शिष्यवृत्ती मिळेल. या विद्यार्थ्यांची सवाद्य सजवलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीमधून मिरवणूक काढली. यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापिका वर्षा गायकवाड, सचिव युवराज गायकवाड यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी युवराज गायकवाड यांनी पी. एम. यंग परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर घेतली होती. जिल्हातील ३३ शाळांमध्ये बाबासाहेब पाटील हायस्कूल होते, असे सांगितले. यावेळी महादेव पाटील, राजेंद्र लव्हटे, शिवाजी पाटील, कृष्णात पाटील, श्रीमती एस. जी. कांबळे, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.