
विद्यार्थ्यां१नी बनविली जोत्याजी केसरकर समाधीची प्रतिकृती
03512
पुनाळ ः वीर जोत्याजी केसरकर स्मारक प्रतिकृती.
जोत्याजी केसरकर समाधीची
विद्यार्थ्यांनी बनविली प्रतिकृती
पुनाळ : मुलांमधील च्या विद्यार्थ्यांच्या अंगी सुप्तगुण असतात. पालकांनी, शिक्षकांनी ते हेरून त्या पद्धतीने मुलांना चालना दिली तर विद्यार्थी अद्भुत करतील यात शंका नाही. येथील समर्थ सुतार, गणेश कारंडे, कार्तिक कुंभार,ओंकार कारंडे, आर्यन सुतार या विद्यार्थ्यांनी गावातील ऐतिहासिक वीर जोत्याजी केसरकर स्मारकाची छोटी प्रतिकृती तयार केली. वीर जोत्याजी केसरकर या मराठा सरदारांचे स्मारक येथील हनुमान मंदिरात आहे. याची हुबेहूब प्रतिकृती चिखलापासून तयार करुन रंगरंगोटी केली. खेळ म्हणून तयार केलेली प्रतिकृती स्मारकात रूपांतर झाल्याने विद्यार्थी वर्गाबरोबर लहानथोरही बघण्यास येऊ लागले. याबद्दल पंचायत समिती सदस्य रवींद्र चौगले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.