बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज मिळवणाऱ्यांवर गुन्हा दाखल.

बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज मिळवणाऱ्यांवर गुन्हा दाखल.

बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज
मिळवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुनाळ, ता. १६ : पतसंस्थेच्या कर्जासाठी ना हरकत पत्रावर बनावट शिक्का मारून सही केल्याचे उघडकीस आल्याने मरळी (ता. पन्हाळा) येथील तिघांवर कळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरळी (ता. पन्हाळा) येथील अमर पांडुरंग पाटील, नंदकुमार पांडुरंग पाटील, हिंदूराव पांडुरंग पाटील या तिघांनी कर्ज मिळण्यासाठी महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था, कोतोली, शाखा कळे येथे अर्ज केला होता. कर्ज मंजुरीसाठी इतर संस्थांमध्ये कर्ज आहे किंवा नाही याबाबतचे ना हरकत पत्र अर्जदाराने सादर करावयाचे असते. कर्जासाठी गडबड करणाऱ्या पाटील बंधूंनी ना हरकत पत्र सादर करण्यात वेळ लावला. त्यानंतर ना हरकत पत्र दिले; पण ते अपूर्ण होते. यासंबंधी संस्थेने सर्व संस्थांचे ना हरकत आणण्यास सांगितले. आरोपी कर्जदारांचे कोतोली येथील दोन संस्थांचे मोठे कर्ज असून ते थकीत आहे. असे असताना विश्वास नागरी सहकारी पतसंस्थेत असलेले कर्ज थकीत न दाखवता त्यांनी विश्वास पतसंस्थेचा बनावट शिक्काच तयार केला व ना हरकत पत्रावर शिक्का व शाखा अधिकारी यांची बनावट सही केली व ना हरकत सादर केले. महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेने स्थानिक चौकशी केल्यानंतर बनावटगिरी केल्याचे निदर्शनास आले. विश्वास नागरी सहकारी पतसंस्थेने संबंधित कर्जदारांना ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नसून संस्थेचा हा शिक्का व सही बनावट असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. विश्वास पतसंस्थेचे शाखा अधिकारी सचिन सर्जेराव भाकरे (रा. कोतोली) यांनी मरळी (ता. पन्हाळा) येथील अमर पाटील, नंदकुमार पाटील, हिंदूराव पाटील यांच्यावर कळे पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com