
कोतोलीत विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा.
कोतोलीत विद्यार्थ्यांचा शपथविधी
पुनाळ : कोतोली (ता. पन्हाळा) श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडीत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा झाला. चोवीस तास काम करण्याची तयारी ठेवा. पेशंटच्या यातना समजून घेत त्याला मदतीची मनस्वी इच्छा असणे जरुरीचे आहे, असे मत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. उमा लाकोळे यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले होते.
नर्सिंग सेवेबाबतची शपथ डॉ. लाकोळे यांनी दिली. डॉ. बी. एन. रावण यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सचिव शिवाजीराव पाटील, प्र-प्राचार्य डॉ. व्ही. पी. पाटील, नोडल ऑफिसर राहुल इंगवले, आयक्युएसी समन्वयक डॉ. बी. एन. रावण, ज्युनिअर विभागप्रमुख व सिनेट सदस्य डॉ. उषा पवार, डॉ. एस. एस. कांबळे, सायन्स विभागप्रमुख यु. बी. पवार, बी. व्होक. प्रमुख शिवानी जाधव उपस्थित होते. नर्सिंग विभागप्रमुख एस. डी. हंकारे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सुप्रिया रेडेकर हिने सूत्रसंचालन केले. वेदिका येरुडकर हिने आभार मानले.