ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये विज्ञान दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये  विज्ञान दिन
ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये विज्ञान दिन

ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये विज्ञान दिन

sakal_logo
By

ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये विज्ञान दिन
पुनाळ : ज्योतिर्लिंग हायस्कूल बोरगाव (ता.पन्हाळा) येथे विज्ञान दिन झाला. मुख्याध्यापक डी. एस. लवटे यांनी विज्ञानाचे जनक ज्यांना समजले जाते, अशा सी. व्ही रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले. विज्ञानाशी संबंधित वस्तूंचा दाखला देत वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असावा, विज्ञान शाप की वरदान याचे महत्त्व सांगितले. समीक्षा येरुडकर, जान्हवी कांबळे, धनश्री धनवडे, साक्षी देसाई या विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक प्रात्यक्षिके दाखवली. यावेळी सहा. शिक्षक सी. डी. चव्हाण, डी. एस. कुटे, माधव कांबळे, सागर कांबळे, शिक्षकेत्तर कर्मचारी, बबन कांबळे, भाऊसो पर्वते उपस्थित होते. डी. एस. चव्हाण यांनी आभार मानले.