काटेभोगांव येथे तुकाराम बीजोत्सव कार्यक्रम. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काटेभोगांव  येथे तुकाराम बीजोत्सव कार्यक्रम.
काटेभोगांव येथे तुकाराम बीजोत्सव कार्यक्रम.

काटेभोगांव येथे तुकाराम बीजोत्सव कार्यक्रम.

sakal_logo
By

03705
काटेभोगावला तुकाराम बीजोत्सव
पुनाळ,ता. १२: काटेभोगाव (ता.पन्हाळा) येथे बाबा रेडीकर गो-गीता सेवा संस्थेच्या आणि वारकरी संप्रदायातर्फे तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या पुण्यस्मृतिनिमित्त तुकाराम बीजोत्सव कार्यक्रम झाला. सकाळी चेरलपुरी ते काटेभोगांव ग्रामदैवत ज्योतिर्लिंग देवालयापर्यंत तुकाराम गाथा आणि प्रतिमेची पालखी सोहळा बबन खटांगळेकर, विकास कांबळे यांच्या उपस्थितीत झाला. भगवान घरपणकर महाराज, पूजा घरपणकर यांच्याहस्ते ध्वजवंदन, प्रतिमापूजन झाले. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष आबा कांबळे यांनी महाराजांचे बारा अभंग व मधुकर कांबळे यांनी आम्ही जातो आमच्या गावा.. गायल्यानंतर पुष्पवृष्टी करून तुकारामबीज वैकुंठ गमन सोहळा झाला. दुपारी बळीराजा शेतकरी संघटना अध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांच्या उपस्थितीत आनंदी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तुकाराम महाराजांचे जीवनकार्यावर भाषणे झाली. जयवंत कांबळे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप झाले. कार्यक्रमाला गणपतराव पाटील, दामाजी वाळवेकर, सचिव प्रमिला सावंत, प्रकाश वाळवेकर, शामराव वाळवेकर, कृष्णात म्हामुलकर, सुरेश वाळवेकर, सागर वाळवेकर, प्रकाश चौगुले, शशिकांत क्षीरसागर उपस्थित होते. रात्री धुंदवडेतील भजनी मंडळ मारुती कांबळे व सहकाऱ्यांचे भजन झाले. कार्यक्रमासाठी मंदाकिनी कांबळे, सुनंदा कांबळे, मालुबाई कांबळे, रोशन राजे, पंकज कांबळे, किरण कांबळे, अक्षय कांबळे, विकास कांबळे, नामानंद कांबळे, सोहम कांबळे, विनायक साळुंखे, प्रमिला वनकोरे, योगीराज कांबळे, स्वरूप कांबळे, अर्जुन कांबळे, भक्ती कांबळे, स्वराली कांबळे, शिवन्या जाधव, रमाकांत कांबळे आदींनी परिश्रम घेतले.