
श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्र .
श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
पुनाळ,ता. १३ : श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली (ता.पन्हाळा) येथे आॅनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्र झाले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व ग्लोबल फौंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानवी जीवन व तंत्रज्ञान’ विषयावर चर्चासत्र झाले. सॅलीसबरी विद्यापीठ, यूएसए येथील डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘तंत्रज्ञान उपयोगाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्याचा वापर करा; अन्यथा मानवी जीवनावर दुष्परिणाम होऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे समस्या सुटतील. परंतु त्यामुळे माणसांमधील निर्मितीक्षमता आणि भावनाशीलता नष्ट होण्याचा धोका असतो.’ अध्यक्षस्थानी राजर्षी छत्रपती शाहू काॅलेज, कोल्हापूर येथील डॉ. सबीहा फरास होत्या. यावेळी तोशीवाल आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, सेनगाव, हिंगोलीतील डॉ. दीपक सुधाकर धारवाडकर, गोवा उच्च शिक्षण उपसंचालक डॉ. एफ. एम. नदाफ, फेडरल युनिव्हर्सिटी अॅग्रीकल्चर ओगल स्टेट नायजेरिया आफ्रिका येथील डॉ. बाबालोला सॅम्युएल यांनीही मार्गदर्शन केले. सेशन अध्यक्ष म्हणून डॉ. सचिन पवार, डॉ. कैलास आंबुलगेकर, डॉ. बी. एन. रावण यांनी काम पाहिले. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक डॉ. अजय चौगुले उपस्थित होते.
चर्चासत्रासाठी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक - अध्यक्ष मा. डॉ. के. एस. चौगुले, संस्था सचिव शिवाजीराव पाटील, डॉ. अजय चौगुले, प्र. प्राचार्य डॉ. व्ही. पी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयक म्हणून डॉ. एस. एस. कुरलीकर व उपसमन्वयक म्हणून अजिंक्य कुंभार यांनी काम पाहिले. इंग्रजी विभागप्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. बी. एन. रावण यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सूत्रसंचालन सिनेट सदस्य डॉ. उषा पवार यांनी केले. ग्रंथपाल एम. व्ही. पाटील यांनी आभार मानले.