पुनाळमध्ये क्षयरोग जनजागृती मोहीम.

पुनाळमध्ये क्षयरोग जनजागृती मोहीम.

03726
पुनाळला क्षयरोग जनजागृती मोहीम
पुनाळ : पडळ आरोग्य केंद्रांतर्गत पुनाळ उपकेंद्रात जागतिक क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येच्या निमित्ताने जनजागृती मोहीम राबविण्यात आली. आरोग्य अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र, जिल्हा क्षयरोग विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग मोहीम राबविली. मोहिमेंतर्गत क्षयरोगाची कारणे, उपचार पद्धती, आरोग्य विभागामार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजना, घ्यावयाची काळजी, विविध घोषणा देऊन जनजागृती केली. यावेळी क्षयरोग उपचार पर्यवेक्षक एन. आर. पाटील, क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक आर. एन. संकपाळ, आरोग्य सहाय्यक सुनील पोवार, समुदाय आरोग्य अधिकारी प्रीती कांबळे, आरोग्यसेवक दीपक बाटे, आरोग्यसेविका अश्विनी वळवी, अपर्णा खोत, मुख्याध्यापिका एस. एम. लाड, शिक्षक, आशासेविका भारती बंगे, सुजाता शिंदे, गीता पाटील, अंजना पोवार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com