कोतोली औषधी वनस्पतींचे महत्व याविषयी कार्यशाळा.

कोतोली औषधी वनस्पतींचे महत्व याविषयी कार्यशाळा.

कोतोलीत औषधी वनस्पतींवर कार्यशाळा
पुनाळ, ता. २३ : श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी - कोतोली (ता. पन्हाळा) येथे कार्यशाळा झाली. येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व अग्रणी महाविद्यालय योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पश्चिम घाटातील औषधी वनस्पतींचे संगोपन, संवर्धन’वर एकदिवसीय कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. श्रीमती व्ही. पी. पाटील होत्या.
उद्घाटन सचिव शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते झाले. निसर्गातील आवळा, हिरडा, बेहडा, धोतरा, आले, काळी मिरी, पिंपळी, आडुळसा, शिकेकाई, कात, मेंदी, गुलाब, निगडी, करंजी, अनंतमूळ, भुईकोवळा, वावडिंग इत्यादी वनस्पतींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करून त्यांचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे आहे; असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर येथील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. वाय. जाधव यांनी केले.
दुसऱ्या सत्रात ‘पश्चिम घाटातील औषधी वनस्पतींचे संगोपन, संवर्धन’ विषयावर न्यू कॉलेज, कोल्हापूरचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही. बी. शिंपले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील अग्रणी महाविद्यालय समन्वयक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते. अग्रणी महाविद्यालयप्रमुख एच. एस. शिरसट यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. पाहुण्यांची ओळख आर. पी. नाळे यांनी करून दिली. डी. एच. नाईक यांनी सूत्रसंचालन, डॉ. एम. एच. पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com