Mon, Sept 25, 2023

वीटभट्टी कामगारांना धान्य वाटप.
वीटभट्टी कामगारांना धान्य वाटप.
Published on : 22 April 2023, 2:04 am
03784
वीटभट्टी कामगारांना धान्य वाटप
पुनाळ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडीतर्फे वीटभट्टी कामगारांना धान्य वाटप झाले. येथील इंग्रजी विभागामार्फत कार्यक्रम झाला. सामाजिक बांधिलकीपोटी धान्य वाटप उपक्रम राबवल्याचे सहाय्यक प्राध्यापक एच. एस. शिरसट यांनी सांगितले. वाघवे (ता. पन्हाळा) परिसरातील गोरगरीब रोजंदारी मजूर व वीटभट्टी कामगारांना सामाजिक बांधिलकी म्हणून श्रीपतराव चौगुले कॉलेजमधील इंग्रजी विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींमार्फत तांदूळ, गहू, साखर, तुरडाळ अन्नधान्याचे वाटप झाले. यासाठी प्र-प्राचार्य डॉ. व्ही. पी. पाटील, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. बी. एन. रावण व सहाय्यक प्राध्यापक एच. एस. शिरसट यांचे मार्गदर्शन लाभले.