सतिश झेंडे सरचिटणीसपदी

सतिश झेंडे सरचिटणीसपदी

03830
सतिश झेंडे

सतिश झेंडे सरचिटणीसपदी
पुनाळ : येथील सतीश तुकाराम झेंडे यांची पन्हाळा तालुका नाभिक संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा कोल्हापूर जिल्हा अंतर्गत पन्हाळा तालुका नाभिक संघटनेच्या नूतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम नुकताच पन्हाळा येथे झाला. यामध्ये झेंडे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव काशीद होते. सरदार झेंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे नियोजन सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. या वेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्यसचिव सयाजीराव झुंजार, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मारुती टिपूगडे, कोल्हापूर जिल्हा नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब काशीद, जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर टिपुगडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख विजय संकपाळ, जिल्हा कार्यकारी चिटणीस मयूर रोकडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दगडू काशीद, कोल्हापूर शहराध्यक्ष विकी सूर्यवंशी, महामंडळाच्या महिला जिल्हाध्यक्षा मेघाराणी जाधव, उपाध्यक्ष भाग्यश्री सूर्यवंशी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com