
कोतोलीत शिक्षक - पालक मेळावा.
03844
कोतोलीत शिक्षक - पालक मेळावा
पुनाळ, ता. ११ : श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली (ता.पन्हाळा) येथे शिक्षक - पालक मेळावा झाला. येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व पालक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्र-प्राचार्य डॉ. व्ही. पी. पाटील होत्या. उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून झाले. यावेळी डॉ. बी. एन. रावण म्हणाले, ‘हे युग स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात पाल्य यशस्वी व्हायचा असेल तर पालकांनी शिक्षणातील बदल समजून घेणे गरजेचे आहे. पालक व शिक्षकांत समन्वय असावा. महाविद्यालयांमध्ये होणारे उपक्रम, कार्यक्रम, स्पर्धेत पाल्य सहभागी होतो का हे पालकांनी पाहावे. त्याच्या सुप्तगुणांना संधी द्यावी.’ अॅक्टिव्हीटीप्रमुख डॉ. एस. एस. कुरलीकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सचिव शिवाजीराव पाटील, पालक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. पी. डी. माने यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. एम. एच. पाटील, आभार डॉ. यु. यु. पाटील यांनी मानले.