Wed, Sept 27, 2023

पुनाळ येथील तरुणाचा बुडून मृत्यू.
पुनाळ येथील तरुणाचा बुडून मृत्यू.
Published on : 20 May 2023, 5:26 am
03870
....
पुनाळ येथील एकाचा बुडून मृत्यू
पुनाळ: येथील संजय मारुती पाखरे (वय ४५) या तरुणाचा कासारी नदीत बुडून मृत्यू झाला. याबाबतची नोंद कळे पोलिसांत झाली आहे. पाखरे हा मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी तो कासारी नदीवर मासे पकडण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाय घसरून तो नदीत पडला. संजयला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी (ता.२०) सायंकाळी साडेसहा वाजता कासारी नदीत पुनाळ- तिरपण धरणाजवळ संजयचा मृतदेह तरंगताना आढळला. त्याच्या मागे आई, वडिल, तीन बहिणी असा परिवार आहे.