
काटेभोगावला मोफत आरोग्य शिबिर
काटेभोगावला मोफत आरोग्य शिबिर
पुनाळ : काटेभोगाव (ता.पन्हाळा) येथे शनिवारी (ता.२७) सकाळी ९ वाजता मोफत आरोग्य शिबिर होणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ९०१ उपचार आणि १२१ पाठपुरावा सेवा समाविष्ट केल्या आहेत. या शिबिरात आरोग्य तपासणी आणि निदान केले जाणार आहे. कान, नाक, घसा, जनरल सर्जरी, अस्थिव्यंग उपचार, नेत्र तपासणी होणार आहे. महालॅब्स या महाराष्ट्र शासनाच्या निःशुल्क प्रयोगशाळेमार्फत मोफत रक्त तपासणी करण्यात येईल. शिबिरामध्ये वरीलपैकी रोगनिदान झाल्यास राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे वैद्यकीय सेवा देण्यात येईल.