काटेभोगावला आरोग्य शिबिर संपन्न. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काटेभोगावला आरोग्य शिबिर संपन्न.
काटेभोगावला आरोग्य शिबिर संपन्न.

काटेभोगावला आरोग्य शिबिर संपन्न.

sakal_logo
By

03907
काटेभोगावः आरोग्य शिबिरात तपासणी करण्यासाठी झालेली गर्दी.
...

काटेभोगाव येथील आरोग्य शिबिराला प्रतिसाद

पुनाळः काटेभोगाव(पन्हाळा) येथील मोफत आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. येथील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव कांबळे यांच्या पुढाकाराने व छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सहकार्याने हे शिबिर झाले. लोकांनी या शिबिराला चांगला प्रतिसाद दिला. तपासणी व प्राथमिक उपचार करून मोफत औषधे देण्यात आली. काही रुग्णांना संदर्भ सेवा देण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई, पांडुरंग काशीद, जयसिंग हिर्डेकर यांनी आरोग्य शिबिराला भेट दिली. सुमारे तीनशेहून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबाराचे आयोजन बाबूराव देसाई, माजी उपसरपंच रघुनाथ पाटील, शशिकांत कांबळे, कृष्णात कांबळे, प्रकाश कांबळे, तानाजी जरग, पोलिस पाटील संभाजी पाटील, बबन खाटांगळेकर, सीताराम भोगावकर यांनी केले.