रांगोळी दहा एकर ऊसाला आग.

रांगोळी दहा एकर ऊसाला आग.

00198
रांगोळी ः छत्री पाव परिसरातील दहा एकर शेतातील उसाला आग लागली.

दहा एकर उसाच्या फडाला आग
रांगोळीत प्रकार; विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्यामुळे शॉर्ट सर्किट

रांगोळी, ता. १६ ः येथील रांगोळी-इचलकरंजी मेन रोडलगत असणाऱ्या छत्री पाव परिसरातील दहा एकर उसाच्या फडाला आग लागली. या आगीत शेतातील उसाला व बांधावर असणाऱ्या झाडांना आग लागून लाखोंचे नुकसान झाले.
येथे भूषण भीमगोंडा पाटील, काकासो पाटील, अजित पाटील, देवगोंडा पाटील, निकम व कुरूंदवाडे यांची शेती आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास महावितरणच्या विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले. यामुळे उसात ठिणग्या पडून शेतकऱ्यांसमोर बघता बघता संपूर्ण उसाच्या फडास आग लागली. यामुळे दहा एकरांतील ऊस जळून खाक झाला. उसाला आग लागण्याच्या घटनांमुळे महिनाभरात गावातील ५०ते ६० एकरांतील ऊस जळाला आहे.

कोट
शेतावरून महावितरणच्या विद्युत तारा गेल्या आहेत. त्या एकमेकांत अडकल्यामुळे स्पार्किंग होऊन शेतातील उसाला आग लागली.
-भीमगोंडा पाटील, शेतकरी.

कोट
या घटनेबाबत वरिष्ठ कार्यालयास माहिती पाठविण्यात येईल. वरिष्ठ अधिकारी व इलेक्ट्रिकल इंजिनिअर यांच्यामार्फत चौकशी करून पंचनामा केला जाईल व योग्य ती कारवाई केली जाईल.
-सुमैया सलगर, सहाय्यक अभियंता, महावितरण ग्रामीण हुपरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com