शिवजयंतीनिमित्त रांगोळीत स्पर्धा

शिवजयंतीनिमित्त रांगोळीत स्पर्धा

शिवजयंतीनिमित्त
रांगोळीत स्पर्धा
रांगोळी, ता. १७ ः येथे शिवजयंतीनिमित्त अक्षता कॉम्प्युटर सेंटरतर्फे प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. पाचवी ते नववीमधील ३५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. कन्या विद्यामंदिर, कुमार विद्यामंदिर, रांगोळी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. कुमार विद्यामंदिरमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी अक्षता कॉम्प्युटरचे राकेश पाटील यांनी मुलांना शिवरायांच्या जीवनावरील व किल्याच्या माहितीबाबत विविध प्रश्न लेखी स्वरूपात दिले होते. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सेंटरतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा होण्यासाठी कन्या विद्यामंदिर, कुमार विद्यामंदिर, न्यू इंग्लिश स्कूल रांगोळी येथील मुख्याध्यापक, शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com