रांगोळी ग्रामपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांगोळी ग्रामपंचायतीच्या  विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध.
रांगोळी ग्रामपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध.

रांगोळी ग्रामपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध.

sakal_logo
By

रांगोळीत विषय समिती निवड बिनविरोध
रांगोळी ता. २५ ः येथील ग्रामपंचायत निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये झाली होती. यावेळी लोकनियुक्त सरपंचासह एकूण पंधरा सदस्य निवडून आले होते. पंचायतीत विविध विषय समिती सभापतींची निवडप्रक्रिया झाली. समित्यांची निवड बिनविरोध झाली. यावेळी अध्यस्थानी सरपंच संगीता नरदे होत्या. ग्रामसेवक कुमार वंजीरे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केल्यानंतर विविध विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेसाठी सुरुवात केली. यावेळी सर्वानुमते निवडी बिनविरोध झाल्या. यामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सभापतीपदी सरपंच संगीता नरदे, पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी सुदर्शन पाटील, बांधकाम सभापतीपदी रजनीकांत माने, दिवाबत्ती सभापतीपदी शिवाजी सूर्यवंशी, शालेय शिक्षण सभापतीपदी किरण कमते, महिला बालकल्याण सभापतीपदी संध्या हावलदार, जैवविविधता सभापतीपदी अश्विनी जंगले, रोजगार हमी सभापतीपदी हुमायून मुल्लाणी यांची निवड झाली. सर्व सभापतींचे सरपंच संगीता नरदे, उपसरपंच सविता मोरे यांनी अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.