रांगोळीत मंगळवारी मॅरेथॉन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांगोळीत मंगळवारी मॅरेथॉन
रांगोळीत मंगळवारी मॅरेथॉन

रांगोळीत मंगळवारी मॅरेथॉन

sakal_logo
By

रांगोळीत मंगळवारी मॅरेथॉन
रांगोळी, ता. ५ ः येथील ग्रामपंचायतीतर्फे गावातील महिला व मुलींसाठी मंगळवारी (ता. ७) मॅरेथॉन स्पर्धा, तसेच ८ मार्चला सकाळी ११ वाजता सौभाग्यवती रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रायोजक मानस मोबाईलचे प्रवीण पाटील आहेत.
ग्रामपंचायतीतर्फे मंगळवारी सकाळी सात वाजता महिला मॅरेथॉन स्पर्धा होणार आहेत. यामध्ये लहान गट, मध्यम गट व खुला गटात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस, मेडल व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. मॅरेथॉनची सुरुवात झेंडा चौक येथून होईल. यानंतर ८ मार्चला सकाळी ११ वाजता सौभाग्यवती रांगोळी ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये पहिली फेरी स्वपरिचय, दुसरी फेरी कलाविष्कार, तिसरी फेरी प्रश्नावली परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे. या स्पर्धेतील विजेत्या एक ते पाच क्रमांकांना सरपंच साडी हे बक्षीस देण्यात येणार आहे. महालक्ष्मी पतसंस्थेतर्फे एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे. अशा माता पालकांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमासाठी मौशमी आवाडे, जयश्री गाट, गंधाली दिंडे, सरपंच संगीता नरदे, डॉ. सुप्रिया माने, पोलिस उपनिरीक्षक ऊर्मिला खोत आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून शुभांगी शिंत्रे असणार आहेत. स्पर्धेत महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे केले आहे.