
स्त्री म्हणून जन्माला आल्याचा अभिमान बाळगा
00244
------------------
स्त्री म्हणून जन्माला आल्याचा अभिमान बाळगा
गंधाली दिंडे; रांगोळीमध्ये ‘सौभाग्यवती रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन
रांगोळी, ता. १० ः एक स्त्री म्हणून जन्माला आला आहात याचा अभिमान बाळगा. जिल्ह्यात दोनशे महिला उद्योजक तयार केल्या आहेत. त्यांचे दिवसात दोन लाख पंचवीस हजार इतके उत्पन्न आहे, अशी माहिती उद्योजकता विकास केंद्राच्या विभागीय अधिकारी गंधाली दिंडे यांनी दिली.
रांगोळी ग्रामपंचायतीतर्फे आयोजित सौभाग्यवती रांगोळी या स्पर्धेच्या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जयश्री गाट होत्या.
दिंडे म्हणाल्या,‘आज महिला पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत असतील पण या संसाररूपी रथाचे पहिले चाक पुरुष असतो हे स्त्रीने विसरु नये. आपला गाव सक्षम होण्यासाठी प्रत्येक घरातून महिला उद्योजक निर्माण झाल्या पाहिजेत. भंडारासारख्या जिल्ह्यातील महिला शेणी विकून व्यवसाय करतात. यांच्या शेणी दुबईमध्ये विक्रीसाठी जातात. त्यांच्या व्यवसायाचा टर्नओव्हर दोन लाख साठ हजार रुपये आहे. आज त्यांना भारत शासनाचा ब्रँड दिला आहे.’ महिला सक्षमीकरण अंतर्गत रांगोळीच्या चार महिला उद्योजक करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
सौभाग्यवती रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना सरपंच साडी भेट देण्यात आली. सूत्रसंचालन रूपाली पाटील यांनी केले. प्रास्ताविक सरपंच संगिता नरदे यांनी केले. आभार संध्या हावलदार यांनी मानले. उपसरपंच सविता मोरे, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी जंगले, शिवाजी सूर्यवंशी, हुमायुम मुल्लाणी, मंगल कमते, सुदर्शन पाटील, दिपाली हुन्नूरगे, स्वाती कांबळे, किरण कमते, सोनाली कांबळे, रजनीकांत माने आदी उपस्थित होते.