Sat, Sept 23, 2023

रांगोळी येथे गुड फ्रायडे निमित्त सुवार्ता फेरी.....
रांगोळी येथे गुड फ्रायडे निमित्त सुवार्ता फेरी.....
Published on : 8 April 2023, 5:39 am
रांगोळीत सुवार्ता फेरी
रांगोळी ः येथील सेंट मेरी चर्चमध्ये गुड फ्रायडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी विश्वशांती व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना केली. ४० दिवस सुरू असलेले उपवास सोडतानाच सायंकाळी सुवार्ता फेरी काढली. सजवलेल्या ट्रॅक्टर मध्ये येशू ख्रिस्तांना क्रुसावर चढवण्यासाठी नेत असतानाचा सजीव देखावा साकारला होता. शिस्तबद्ध पद्धतीने ख्रिस्ती बांधव फेरीमध्ये सहभागी झाले होते. येथील सेंट मेरी चर्चपासून येशूची गाणी गात येशूंच्या नावाने जयघोष करीत प्रमुख मार्गावरून फेरी काढली. फेरीची सांगता सेंट मेरी चर्चजवळ झाली. फेरीचे व प्रार्थनेचे नियोजन फादर अमोल माने, रुपेश ऐवाळे, सचिन ऐवाळे व ख्रिस्ती बांधवांतर्फे केले होते.