रांगोळीत पंचगंगा घाटाची स्वच्छता

रांगोळीत पंचगंगा घाटाची स्वच्छता

00326
रांगोळी ः येथील शिवछत्रपती मंडळातर्फे पंचगंगा नदी घाटाची स्वच्छता केली.
--------
रांगोळीत पंचगंगा घाटाची स्वच्छता
रांगोळी, ता. २३ ः येथील शिवछत्रपती मंडळातर्फे नृसिंह जयंती सोहळा साजरा केला जात आहे. यानिमित्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदी घाटाची स्वच्छता केली. यामुळे कित्येक दिवस घाटावर साचून राहिलेला कचरा व झाडे झुडपे काढल्यामुळे घाटाचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
येथील शिवछत्रपती मंडळातर्फे दरवर्षी नृसिंह जयंती सोहळा नऊ दिवस साजरा केला जातो. यावेळी विविध उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात. यावर्षी नदी घाट स्वच्छता अभियान राबवले. पहाटे सहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये घाटावर उगवलेली काटेरी झाडे झुडपे तसेच महापुरामुळे येऊन साचलेला गाळ काढला. उत्सवासाठी देण्यात येणाऱ्या देणगीतून अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना मदत देण्यात येणार आहे. उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष उदयसिंग माने, उपाध्यक्ष ऋषिकेश जाधव, प्रणव पाटील, अभिषेक कागवाडे, शुभम बाळीकाई, केदार कागवाडे, विशाल सडोले, सार्थक मगदूम, कार्तिक कमते आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com