रांगोळी ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर

रांगोळी ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर

00349
रांगोळी ः येथील थकीत पाणीपट्टीधारकांची नळकनेक्शन तोडण्यास प्रारंभ केला आहे.
---------
रांगोळी ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर
५६ लाख कर थकीत; थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यास प्रारंभ
रांगोळी, ता. १० ः येथील ग्रामपंचायतीची पाणीपट्टी व घरफाळा वसुली झाली नाही. यामुळे ग्रामपंचायतीचा ५६ लाख कर थकीत आहे. यामुळे ग्रामपंचायतीमार्फत थकीत पाणीपट्टीधारकांचे नळ कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता रांगोळी ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.
गावचा विकास व अर्थकारण सांभाळण्यासाठी महसूल गोळा करणे गरजेचे आहे. घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी प्रशासनाने कोणतेच प्रयत्न केले नाहीत. सध्या उन्हाळ्यास सुरुवात झाली आहे. नवीन पाणी योजनेचे काम सुरू आहे. चालू पाणीपुरवठ्याचे लाईट बिल थकीत आहे, यामुळे कधीही विद्युत पुरवठा बंद होऊ शकतो. कामगारांचे पगार, अचानक लागणारी पाणी पुरवठ्याची कामे यामुळे कर वसुली न झाल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे करवसुली झाली पाहिजे. यासाठी सरपंच संगीता नरदे यांनी विशेष सभा बोलावून यावर चर्चा केली. त्यानंतर थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने थेट मोहिम उघडली आहे. थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडली जात आहेत. त्यामुळे थकबाकी भरण्यास सुरवात झाली आहे.
----------------
थकबाकीदारांचे धाबे दणाणले
थकीत कर, पाणीपट्टी न भरल्यास नळ कनेक्शन तोडण्याबाबत गावातून दवंडी दिली होती. परंतु याचा कोणताही परिणाम या थकबाकीधारकांवर झाला नाही. त्यामुळे सरपंच सदस्य व प्रशासनातर्फे नळ कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.
--------------

आजअखेर ५० कनेक्शन तोडली आहेत. यामुळे थकबाकीदारांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे. रोज पन्नास हजार इतका कर वसुली होत आहे.
-कुमार वंजीरे, ग्रामसेवक, रांगोळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com