कारले शेतीतुन लाखोंचे उत्पन्न

कारले शेतीतुन लाखोंचे उत्पन्न

00356
रांगोळी ः येथील अभय मगदूम यांनी केलेली कारली शेती.
---------
कारले शेतीतुन लाखोंचे उत्पन्न
रांगोळीतील युवा शेतकारी अभय मगदूम यांची जिद्द
रांगोळी, ता. १४ ः योग्य नियोजन, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेती पिकातुन लाखोंचे उत्पादन येथील अभय मगदूम या तरुण शेतकऱ्याने घेतले आहे.
अभय यांची वडीलोपार्जीत शेतजमीनमध्ये प्रत्येक वर्षी ऊसाची शेती करायचे पण उसाला येणारा खर्च आणि तोडणीसाठी लागणारा वेळ पाहता त्यांच्या लक्षात आले की ऊस शेती आता परवडत नाही. भाजीपाला करण्याचे ठरवले. त्यातुनच त्यांनी कारली शेतीची माहिती घेतली. ४५ ते ५० दिवसांत उत्पन्न देणारे कारली लागवड त्यांना फायद्याची वाटु लागली. त्यामुळे त्यांनी एक एकरात कारल्याचे पिक घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी नांगरट मारुन पाच फुटाच्या सऱ्या सोडल्या. यामध्ये शेणखत, भेसळढोसनंतर ठिबक सिंचन टाकुन त्यावर मल्चिन पेपर अंथरले. त्यानंतर अडीच बाय पाच फुटाच्या अंतराने बियाणांची लागवड केली.
वेळोवेळी औषध फवारणी केली. ठिबक सिंचनाने खते दिली. चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी कारली पूर्ण तयार झाली. कारल्याचे एक दिवस आड सहाशे ते सातशे किलो उत्पादन चालू आहे. ती वाशी मार्केट मुंबई व कोल्हापूर येथे पाठविण्यात येतात. सध्याचा भाव पंचवीस ते तीस रुपये किलो असुन त्यामुळे खर्च वजा जाता पाच ते सहा लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे.
--------------
आजच्या परिस्थितीत नोकरी व व्यवसायातील स्पर्धा पाहता तरुण मुलांनी शेतीकडे वळावे. योग्य नियोजन व चिकाटी केल्यास शेतीमधून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे सर्वांसाठी शेती हा उत्तम पर्याय आहे.
-अभय बाळासो मगदूम, शेतकरी, रांगोळी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com