आकिवाटचा स्वराज्य स्पोर्ट्स विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकिवाटचा स्वराज्य स्पोर्ट्स विजेता
आकिवाटचा स्वराज्य स्पोर्ट्स विजेता

आकिवाटचा स्वराज्य स्पोर्ट्स विजेता

sakal_logo
By

00359
रांगोळी ः येथील धरणग्रस्तांच्या क्रिकेट स्पर्धेत स्वराज्य स्पोर्ट्स आकिवाट यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
--------
आकिवाटचा स्वराज्य स्पोर्ट्स विजेता
रांगोळीत धरणग्रस्त मर्यादित क्रिकेट स्पर्धा; सांगावचा अजिंक्यतारा उपविजेता
रांगोळी, ता. १६ ः येथील मराठा मंडळातर्फे धरणग्रस्त मर्यादित क्रिकेट स्पर्धा घेतल्या. यामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स संघ विजेता ठरला.
येथील काळम्मावाडी वसाहतीच्या मैदानावर धरणग्रस्त मर्यादित क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. सुमारे पन्नास हजार रुपयांची बक्षीसे देण्यात आली. प्रत्येक गावात काळम्मावाडी व राजापूर येथील धरणग्रस्तांच्या वसाहती आहेत. येथील खेळाडुसांठी या स्पर्धा घेण्यात येतात. रांगोळी येथे झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामना अजिंक्यतारा स्पोर्ट्स सांगाव व स्वराज्य स्पोर्ट्स आकिवाट यांच्यामध्ये झाला. यामध्ये स्वराज्य स्पोर्ट्सच्या सागर रेपे याच्या तुफान फलंदाजीमुळे या संघाने विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक अजिंक्यतारा स्पोर्ट्स सांगाव, तृतीय क्रमांक आर.जे. स्पोर्ट्स उदगाव, चतुर्थ क्रमांक रामलिंग स्पोर्ट्स पट्णकोडोली यांनी मिळवला. एकूण चोवीस संघ सहभागी झाले होते.
विजेत्या संघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे समालोचन महावीर हुन्नुरगे, भिकाजी केणे, विशाल भोसले, देवराज खोत यांनी केले. स्पर्धेचे आयोजन मराठा कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ काळम्मावाडी यांनी केले.