
शाहू महाविद्यालयात कार्यशाळा
शाहू महाविद्यालयात कार्यशाळा
रुकडी : पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या काही वर्षांत पर्यावरणाची स्थिती फारच बिकट होऊन त्याचे परिणाम मानवासह सजीव सृष्टीला भोगावे लागतील. प्लास्टिकचा वापर, रासानिक खते, किटकनाशके, तणनाशके यांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचे प्रदूषण झाले असून, पर्यावरणाचे प्रदूषण थांबवण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. नैसर्गिक खतांचा वापर वाढवला पाहिजे. सौरऊर्जा, पवन ऊर्जा, जैविक ऊर्जा वापराला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मत प्रा. वैशाली हावळे यांनी व्यक्त केले. त्या येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केलेल्या पर्यावरण संवर्धन व संरक्षण आणि अभ्यास व प्रकल्प लेखन या विषयावरील कार्यशाळेत बोलत होत्या. डॉ. माधवी सोळांकूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक पाटील होते. डॉ. खंडेराव शिंदे यांनी आभार मानले.
Associated Media ़़Ids : RKD22B01220
Web Title: Todays Latest Marathi News Rkd22b01084 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..