कोल्हापूर -इचलकरंजी मार्गावरील रूकडी येथील उड्डाणपूलाचे काम संथ गतीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर -इचलकरंजी मार्गावरील रूकडी येथील उड्डाणपूलाचे काम संथ गतीने
कोल्हापूर -इचलकरंजी मार्गावरील रूकडी येथील उड्डाणपूलाचे काम संथ गतीने

कोल्हापूर -इचलकरंजी मार्गावरील रूकडी येथील उड्डाणपूलाचे काम संथ गतीने

sakal_logo
By

B01223
रुकडी ः येथील रेल्वे गेट क्र. २० वरील उड्डाणपुल अपूर्ण असल्याने निर्माण झालेली वाहतूक कोंडी

अर्धवट उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी
कोल्हापूर -इचलकरंजी मार्गावरील रेल्वे गेट ः परिसरात वाढले अपघांचे प्रमाण
रूकडी ता. ४ : येथे कोल्हापूर -इचलकरंजी मार्गावरील रेल्वे गेट क्र.२० या ठिकाणीचे नियोजित उड्डाणपूलाचे काम संथ गतीने सुरू असलेले वाहतूक कोंडी होऊन अपघाताचे प्रमाणात वाढ होत आहे.
कोल्हापूर -इचलकरंजी मार्गातील महत्वपूर्ण हा उड्डाणपूल असून संबंधित काम लवकर पूर्ण व्हावे, अशी नागरिकांची मागणी होत आहे. संबंधित उड्डाणपुलाचे कामकाज पूर्ण करण्याची मुदत वर्षापूर्वीच संपली आहे.
संबंधित काम पूर्ण करण्याची जबाबदारी घेतलेल्या ठेकेदारामध्ये वारंवार बदल झाले आहेत. आतापर्यंत तीन ठेकेदारांनी काम घेऊन ते अर्धवट सोडले. यापूर्वी बांधकाम पूर्ण करण्याची जबाबदारी प्लेटीना इन्फ्रा कंपनीकडे होती. सध्या मिचगेन या कन्स्ट्रक्शन कंपनीकडे उड्डाणपुलाच्या कामाची जबाबदारी आहे. सुमारे २५ कोटी रुपये या उड्डाणपुलासाठी खर्च होणार आहेत परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्याने वाहतूकदारांना मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच अरुंद रस्ता, वाहतुकीचे प्रमाण जास्त, रात्रीच्या वेळी पथदिव्यांचा अभाव या कारणाने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
यासंदर्भात रेल्वे प्रशासनचे डेप्युटी जनरल मॅनेजर अजय हणमते यांना विचारले असता ते म्हणाली की " चार-पाच महिन्यांमध्ये संपूर्ण काम पूर्ण होईल. या अटीवरच मिचेगन कन्स्ट्रक्शन कंपनीकडे कामाची जबाबदारी दिली आहे."
उड्डाणपुलाचे रखडलेली कामे रेल्वे प्रशासनाकडून लवकर पूर्ण व्हावीत, आणि वाहनधारकांचा नाहक त्रास कमी व्हावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

चौकट....
कामे संथ गतीने
''महारेल'' यांचा महत्वकांशी प्रकल्प अंतर्गत कोल्हापूर -इचलकरंजी दरम्यान रूकडी, माणगांववाडी, हातकणंगले येथे भुयारी मार्ग असो किंवा उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने वाहतूकदारांना नाहक त्रास होऊन अपघात होत आहेत. याची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Rkd22b01086 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top