सोसायटींनी लोकहिताचे उपक्रम राबवावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोसायटींनी लोकहिताचे उपक्रम राबवावेत
सोसायटींनी लोकहिताचे उपक्रम राबवावेत

सोसायटींनी लोकहिताचे उपक्रम राबवावेत

sakal_logo
By

सोसायटींनी लोकहिताचे उपक्रम राबवावेत
राजू शेट्टी; मौजे मुडशिंगी येथे विकासकामांचे लोकार्पण
रुकडी, ता. ९ : महागाईमुळे शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे. केंद्र सरकारने सबसिडी बंद केल्यामुळे रासायनिक कारखाने बंद पडले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नैसर्गिक साधन संपत्तीवर भारतातील नागरिकांना समान अधिकार आहे असे सांगितले आहे. तरीपण वीजपुरवठा करताना सरकार व महावितरण कंपनी इतरांना चोवीस तास विद्युतपुरवठा करते व शेतकऱ्यांना रात्रीची केवळ आठ तास वीज दिली जाते असा मतभेद का करत आहे. रात्रीची लाईट असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवावर बेतणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे. सरकारने साखर कारखानदारांना संरक्षण देण्यासाठी एफआरपीचे तुकडे देण्याचे कट-कारस्थान केले आहे. विकास सेवा सोसायटीमार्फत विविध लोकहिताचे उपक्रम राबवावेत. त्यामुळे सेवा सोसायटी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. मौजे मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथे मीनाक्षी खरशिंगे यांचा वाढदिवस व विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पांडुरंग विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अनिरुद्ध शिंदे, पोलिसपाटील परिक्षित शिंदे, संजय शिंगाडे, बाजीराव नाईक, प्रकाश खरशिंगे, सतीश पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Rkd22b01092 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top