पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

विधवा प्रथा बंद करणाऱ्या
कुटुंबाचा घरफाळा, पाणीपट्टी माफ
--
माणगाव ग्रामपंचायतीचा निर्णय; १५ ऑगस्टला होणार सन्मान

रुकडी, ता. १३ : माणगाव (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्यासाठी आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. समाजात विधवांना योग्य सन्मान मिळावा, अपमानीत वागणुकीपासून महिलांची रक्षण व्हावे, यासाठी गावसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याची अंमलबजावणी करण्यासाठी व जनजागृती व्हावी, यासाठी जे कुटुंब स्वतःहून या ठरावाची अंमलबजावणी करतील, अशा कुटुंबाचा एक वर्षाचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्यात येईल व अशा कुटुंबातील एका व्यक्तीचा १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीतर्फे त्यांना सन्मानपत्र व ५००० रुपयाचे अनुदान देण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे. विद्या उमेश जोग या ठरावाचे सूचक होते. तर स्वप्नाली अविनाश माने या अनुमोदक होते, अशी माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली.
या वेळी उपसरपंच अख्तर भालदार व ग्रामविकास अधिकारी, सर्व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Rkd22b01102 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top