रुकडीत वृक्षांसोबत मैत्री दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुकडीत वृक्षांसोबत मैत्री दिवस
रुकडीत वृक्षांसोबत मैत्री दिवस

रुकडीत वृक्षांसोबत मैत्री दिवस

sakal_logo
By

01429
-----------

रुकडीत वृक्षांसोबत मैत्री दिवस

रूकडी, ता. ७ : माणसाला निसर्गामार्फत विना मोबदला अनेक महत्त्वपूर्ण बाबी मिळत असतात. निसर्गच मानवाचा खरा मित्र असतो. त्याच्या संवर्धनासाठी आपण सदैव प्रयत्न केला पाहिजे, असे मत आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप बनकर यांनी व्यक्त केले. आधार फाउंडेशनतर्फे वृक्षांसोबत मैत्री दिवस साजरा केला.
ऑक्सिजन पार्कमध्ये दर रविवारीप्रमाणे या रविवारीही वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी श्रमदान केले. यावेळी बालचिमुकल्यांनी १५ वृक्षांचे रोपण करून त्यांना मित्र बनवले. श्री. बनकर म्हणाले,‘एक खरा मित्र मित्राच्या मदतीला धावून येतो. त्याच पद्धतीने निसर्गही मानवाच्या मदतीला न बोलता येत असतो. पण वाढत्या लोकसंख्येमुळे निसर्गाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. तो कुठेतरी थांबला पाहिजे. आपण एक खरा मित्र बनून आता वृक्षाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केला पाहिजे.’ आधार फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य अनेक स्वयंसेवक, बाल चिमुकल्यांचाही सहभाग होता.

Web Title: Todays Latest Marathi News Rkd22b01210 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..