इचलकरंजी तालुक्यासाठी वीस गावांचा एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी तालुक्यासाठी वीस गावांचा एल्गार
इचलकरंजी तालुक्यासाठी वीस गावांचा एल्गार

इचलकरंजी तालुक्यासाठी वीस गावांचा एल्गार

sakal_logo
By

इचलकरंजी तालुक्यासाठी वीस गावांचा एल्गार
१५ तारखेपासून एक एक गाव बंद ठेवण्याचा निर्णय; साजणीमध्ये बैठक

रूकडी ता.२९ : आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांचा निषेध करत आहोत. यापुढे असे बेताल वक्तव्य झाल्यास जशास तसे उत्तर देऊ, असे मत सरपंच राजू मगदूम यांनी साजणी (ता. हातकणंगले) नवमहाराष्ट्र सुतगिरणी येथे झालेल्या बैठकीमध्ये केले. अल्पसंख्याक सेलचे शाकील अत्तार यानी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. तसेच इचलकरंजी तालुका निर्मितीस पाठिंबा जाहीर केला.
श्री. मगदूम म्हणाले,‘आमदार राजूबाबा आवळे यांनी नवीन तालुका निर्मितीसाठी प्रयत्न करावा. शाकील अत्तार यांनी नेत्याचा आडून बेताल वक्तव्य करु नये. तालुक्याची लोकसंख्या २०११ जनगणनेनुसार ८०३२६१ इतकी असून पश्चिम, दक्षिण, उत्तर असा विभागाला आहे. यामुळे वीस गावांना दळणवळणाच्या दृष्टीने हातकणगंले आडमार्गी व गैरसोयीचे ठरत आहे. यामुळे श्री. आवाडे यांनी मागणी केलेली योग्य आहे.’
इचलकरंजी तालुक्याची निर्मितीस वीस गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला. तसा एकमुखी ठराव केला. वेळ पडल्यास न्यायालयीन व प्रशासकीय लढा देऊ. १५ सप्टेंबरपासून दररोज एक गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. इचलकरंजी तालुका कृती समिती ग्रामीण अध्यक्षपदी शिवाजी पाटील यांची निवड केली. कृष्णात बाणदार (पट्टणकोडोली), विलास पाटील (साजणी), निलेश पाटील (कबनूर), मंगल मिणचेकर (तिळवणी), सरपंच जयश्री भोजकर (पट्टणकोडोली), अख्तरहुसेन भालदार (माणगांव), दिनकर कांबळे (साजणी), आण्णासाहेब शेंडुरे (हुपरी), सुभाष चौगुले (रूई), राजकुमार नाईक (रेंदाळ), सूरज बेडगे (हुपरी),चेतन चौगुले (इंगळी) उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Rkd22b01232 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..