अहमद शाबाजी मुल्ला यांचे नाव रुकडीतील उड्डाणपुलास देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहमद शाबाजी मुल्ला यांचे नाव रुकडीतील उड्डाणपुलास देण्याची मागणी
अहमद शाबाजी मुल्ला यांचे नाव रुकडीतील उड्डाणपुलास देण्याची मागणी

अहमद शाबाजी मुल्ला यांचे नाव रुकडीतील उड्डाणपुलास देण्याची मागणी

sakal_logo
By

अहमद शाबाजी मुल्ला यांचे नाव
रुकडीतील उड्डाणपुलास देण्याची मागणी
रुकडी ः अतिग्रे-इचलकरंजी (ता.हातकलंगले) महामार्गावरील रूकडी येथील नुतन उड्डाणपुलाचे नामकरण महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या विधिमंडळाचे पहिले (विधानसभा सदस्य) आमदार स्वातंत्रवीर अहमद शाबाजी मुल्ला उड्डाणपूल असे करावे, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते ॲड. अमितकुमार भोसले यांनी निवेदन सादर केले आहे.
रुकडी गावचे सुपुत्र आमदार अहमद शाबाजी मुल्ला यांनी ब्रिटीश शासनाविरोधात स्वातंत्र लढयात राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली लढा दिला होता. त्यांनी इंग्रज ब्रिटीश गर्व्हनर सर वेल्सी विल्सन यांचा कोल्हापूर येथील पुतळा नष्ट केला म्हणून तुरुंगवास शिक्षा त्यांना दिली होती. त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या स्थापित ९ सप्टेंबर १९४९ विधीमंडळामध्ये आमदार म्हणून निवड झाली होती. अभिमानास्पद कार्याची प्रेरणादायी आठवण पुढील पिढीसाठी कायमपणे रहावी. यासाठी अतिग्रे-इचलकरंजी महामार्गावरील नुतन उडाणपुलाचे आमदार अहमद शाबाजी मुल्ला नामकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.