शेतीला पाणीपुरवठा सुरळीत करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतीला पाणीपुरवठा सुरळीत करा
शेतीला पाणीपुरवठा सुरळीत करा

शेतीला पाणीपुरवठा सुरळीत करा

sakal_logo
By

शेतीला पाणीपुरवठा सुरळीत करा
खासदार धैर्यशील माने यांच्या महावितरणला सूचना
रुकडी ता. २ : विद्युत पुरवठा त्रुटी दूर करून त्वरित शेतीला पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी सूचना खासदार धैर्यशील माने यांनी महावितरण जयसिंगपूरचे वरिष्ठ अभियंता वैभव गोंदिवले यांना दिल्या.
ते रूकडीत एका कार्यक्रमसाठी आले होते. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर लगेच वरिष्ठ अभियंत्यांना दूरध्वनी लावून विद्युत पुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यास सांगितले.
रूकडी गावातील पाणी पुरवठा करणारे जॅकवेल पावसाळ्यामध्ये नदीत कोसळून विद्युत पुरवठा खंडित पडला होता. त्यानंतर संस्थेने उपाययोजना करू शेतीला पाणी पुरवठा सुरळीत चालू केला होता. पण वीस दिवस शेतीला पाणी पुरवठा बंद असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. शेतीला नियमित पाणी मिळवण्यासाठी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर खासदार माने यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतीला पाणीपुरवठा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
------------------
रुकडी शेतकी सह सोसायटीचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी विद्युत पुरवठ्यातील त्रुटी दूर करण्याचे काम चालू आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. लवकरच सुरळीत व योग्य व्होल्टेजनुसार विद्युत पुरवठा होईल.

- वैभव गोंदिवले,
वरिष्ठ अभियंता, महावितरण, शाखा जयसिंगपूर