सुधारित बातमी एमपीएससी परीक्षेत साजणीचा शुभम पाटील राज्यात दुसरा

सुधारित बातमी एमपीएससी परीक्षेत साजणीचा शुभम पाटील राज्यात दुसरा

01723

शुभम पाटील राज्यात दुसरा

रूकडी ता. १ : साजणी (ता. हातकणंगले) येथील शुभम गणपती पाटील यांची एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जाऊ शकतो हे शुभम यांनी सिद्ध केले.
त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक असून आई गृहिणी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण कुमार विद्यामंदिर साजणी येथे झाले. सहावी ते दहावी नवोदय विद्यालय कागल शिक्षण झाले. त्यांने दहावीत पहिला क्रमांक पटकावला होता. अकरावी व बारावी हौसाबाई विद्यालय निमशिरगांव येथे शिक्षण घेतले. त्याने बारावीतही पहिला क्रमांक पटकावला होता. बीएससीचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झाले. तेथे त्याला ए प्लस श्रेणी मिळाली. पुणे येथे त्याने स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाची सुरुवात केली. २०२० च्या राज्यसेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात बाविसावा क्रमांक त्याने प्राप्त केला. तो सध्या सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क या पदावर कार्यरत आहे.
फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण घेतलं असल्यामुळे त्याचाही फायदा झाला. एमपीएससी परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवणे आवश्यक आहे. खूप वेळा असं होतं की परीक्षा जवळ आल्याने काही विद्यार्थी दहा-तास बारा तास अभ्यास करतात. परीक्षा लांब असते तेव्‍हा आपण म्हणावं तितका अभ्यास करत नाही. इतर गोष्टींकडे आपले लक्ष अधिक जातं, त्यामुळे वर्षभर सातत्यपूर्ण अभ्यास करणे आवश्यक असते. परीक्षा देत असताना प्लॅन बी असावा. परंतु क्षमता ओळखून अधिक फोकस हा प्लॅन ए वरती असावं. 100 टक्के लक्ष्यावरती फोकस करून तयारी करणे आवश्यक आहे; असे शुभम पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com