वृत्तपत्र विक्रेत्याचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी मागणीचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृत्तपत्र विक्रेत्याचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी मागणीचे निवेदन
वृत्तपत्र विक्रेत्याचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी मागणीचे निवेदन

वृत्तपत्र विक्रेत्याचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी मागणीचे निवेदन

sakal_logo
By

01745
रुकडी ः वृत्तपत्र विक्रेत्याचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी आमदार राजूबाबा आवळे यांना हातकणंगले तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे अध्यक्ष सुनील पाटील यांनी निवेदन दिले.

-----------------
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मंडळ स्थापन करा
तालुका संघटनेतर्फे आमदार राजूबाबा आवळे यांच्याकडे मागणी; निवेदन सादर
रूकडी, ता. १३ : राज्यातील वृत्तपत्र विक्रेते, एजंट आणि व्यवसायामधील इतर घटकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी हातकणंगले तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे आमदार राजूबाबा आवळे यांना मागणीचे निवेदन दिले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे वृत्तपत्र होय राज्यातील किमान चार लाख लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन हा व्यवसाय आहे. देशाने अमृत महोत्सवी वर्ष पार केलेल्या स्वातंत्र्योत्तर काळात वृत्तपत्रांच्या क्षेत्रात माहितीपासून ते छपाईपर्यंत आमुलाग्र बदल झाले आहेत. परंतु वृत्तपत्र वितरणाच्या पद्धती या परंपरागतच आहेत. आगामी काही वर्षात यामध्ये बदलाची संभावना नाही यामध्ये काही घटकांना शासनाने सोयी सवलती दिल्या आहेत पण सर्वात तळात असणारा घटक म्हणजे वृत्तपत्र विक्रेता हा शासनाच्या सोयी सवलतीपासून दुर्लक्षित आहे. शासन स्तरावरील सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे, असे हातकणंगले तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी म्हटले आहे. सचिव अण्णासो पाटील, कुबेर हंकारे, संदीप दाभाडे, तुळशीदास कटकुळे आदी उपस्थित होते.