मानवी अविवेकी विचाराने पर्यावरणाची प्रचंड हानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानवी अविवेकी विचाराने पर्यावरणाची प्रचंड हानी
मानवी अविवेकी विचाराने पर्यावरणाची प्रचंड हानी

मानवी अविवेकी विचाराने पर्यावरणाची प्रचंड हानी

sakal_logo
By

फोटो ओळ : पर्यावरण अभ्यास व संशोधन प्रकल्प लेखन कार्यशाळेत बोलताना डॉ. अतिश पाटील. शेजारी प्रा. वैशाली हावळे.

मानवी अविवेकी विचाराने पर्यावरणाची प्रचंड हानी

डॉ. अतिश पाटील ः रुकडीत राजर्षी शाहू महाविद्यालयात कार्यशाळा

रुकडी, ता. १८ : ‘मानवाच्या अविवेकी विचारामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी झाली असून, त्याचा धोका पृथ्वीवरील सर्वच जीवसृष्टीला पोहोचला आहे. मानवाने स्वतःचे जीवन तर धोक्यात घातले आहेच, त्याचबरोबर पृथ्वीवरील सर्वच सजीवांच्या अस्तित्वाला धोका पोहोचवला आहे. आज सर्वत्र पर्यावरण संवर्धनाची व संरक्षणाची चर्चा होत आहे. मात्र, पर्यावरण संवर्धन व संरक्षणापूर्वी पर्यावरणाचा अभ्यास केला पाहिजे,’ असे मत डी.के.ए.एस.सी. कॉलेज इचलकरंजी येथील डॉ. अतिश पाटील यांनी व्यक्त केले.
तेथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजना, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी हेरिटेज आणि रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘पर्यावरण अभ्यास व संशोधन प्रकल्प लेखन’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी हेरिटेजचे सेक्रेटरी रो. मनोज झंवर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे होते. डॉ. अशोक पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. दुसऱ्या सत्रात श्री. अण्णासाहेब डांगे कॉलेज हातकणंगलेच्या प्रा. वैशाली हावळे यांनी पदवीच्या द्वितीय वर्षासाठी आवश्यक असणाऱ्या संशोधन प्रकल्प लेखन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत श्री. विजयसिंह यादव महाविद्यालय पेठवडगाव क्लस्टरमधील विविध महाविद्यालयांतील १०० हून जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. समारोप व प्रमाणपत्र वितरण समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगावचे प्राचार्य डॉ. एस. डी. डिसले यांच्या उपस्थितीत व शशिकांत कसबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी जयप्रकाश एज्युकेशन सोसायटी पेठवडगावच्या संचालिका प्रा. प्रमिला माने उपस्थित होत्या. डॉ. माधवी सोळांकूरकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गिरीश मोरे यांनी आभार मानले.
..........................