
श्रीमती वैशाली दाभाडे रयत सेवक पुरस्काराने सन्मानित
01860
साताराः येथे अॅड. दिलवार इस्माईल मुल्ला यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना वैशाली दाभाडे.
....
वैशाली दाभाडे यांचा सन्मान
रुकडी : येथील श्रीमती वैशाली जगन्नाथ दाभाडे यांना रयत शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा माजी प्राचार्य एन. आर. माने निष्ठावान गुणी रयत सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे कायदा सल्लागार अॅड. दिलवार इस्माईलसाहेब मुल्ला यांच्या हस्ते सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील होते. दाभाडे यांनी रयत शिक्षण संस्थेत उपशिक्षिका म्हणून दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. दाभाडे या सध्या श्री. पद्माराजे विद्यालय, शिरोळ येथे कार्यरत आहेत. कार्यक्रमास डॉ.विठ्ठल शिवणकर, सहसचिव डॉ.शिवलिंग मेनकुदळे ,सहसचिव राजेंद्र साळुंखे, डॉ.बी. टी.जाधव ,पदाधिकारी व रयत सेवक उपस्थित होते.