रोटरीतर्फे युवागौरव पुरस्काराचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरीतर्फे युवागौरव पुरस्काराचे वितरण
रोटरीतर्फे युवागौरव पुरस्काराचे वितरण

रोटरीतर्फे युवागौरव पुरस्काराचे वितरण

sakal_logo
By

01882
रुकडी ः येथे रोटरीतर्फे दिलेल्या युवागौरव पुरस्कार वितरणप्रसंगी मान्यवर व पुरस्कार प्राप्त युवक व युवती उपस्थित होते.
------------
रोटरीतर्फे युवागौरव पुरस्काराचे वितरण
रुकडी ः ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात, तेव्हाच यशस्वी होता येते. ज्याप्रमाणे हिऱ्याला पॉलिश केल्यानंतर हिरा चमकतो त्याप्रमाणे युवकांनी आपापल्या क्षेत्रात चमकले पाहिजे, असे मत प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी व्यक्त्त केले. ते रोटरी क्लब अतिग्रे, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्यूटिव्हतर्फे आयोजित रोटरी युवा गौरव पुरस्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कवन देशपांडे होते. सलोनी कबाडे, मैत्रीय खोत, प्रमोद माळी, शुभम निगुडगेकर, संकेत पाटणी, चैतन्य चव्हाण, निलेश पाटील, आयुष जैन-कासलीवाल आणि ज्ञानेश्वर माने यांचा सत्कार केला. सहायक प्रांतपाल प्रशांतकुमार कांबळे, कवन देशपांडे, संदीप कल्याणकर यांना युवागौरव पुरस्कार प्राप्त केला. संतोष पाटील, प्रकाश लाहोटी, शर्मिला साबळे उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक रोटरी क्लब अतिग्रेच्या अध्यक्षा यास्मिन मणेर यांनी केले. दीप्ती मराठी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रवी कोळेकर यांनी केले.