महादेव दूध संस्थेची सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महादेव दूध संस्थेची सभा
महादेव दूध संस्थेची सभा

महादेव दूध संस्थेची सभा

sakal_logo
By

महादेव दूध संस्थेची सभा
शिरोली दुमाला, ता. ९ : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील महादेव दूध संस्थेची ३३ वी व हरहर महादेव विकास सेवा संस्थेची १२ वी संयुक्त सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी धोंडिराम कारंडे व आनंदा मोहिते होते. दूध संस्थेचे अहवाल वाचन सचिव कुंडलिक कारंडे व सेवा संस्थेचे अहवाल वाचन गणेश निकम यांनी केले. प्रास्ताविकात कुंडलिक कारंडे म्हणाले, ‘‘संस्थेची शंभर टक्के वसुली झाली असून वर्ग ऑडिट सतत ‘अ’ आहे. कर्जे, ठेवी, डिव्हिडंट या सर्वच बाबतीत संस्थेचे कार्य उत्कृष्ट आहे.’’ कार्यक्रमास दत्तात्रय निकम, एकनाथ पाटील, पंढरी निकम, गोरख मोहिते, बाजीराव कारंडे, प्रकाश पाटील, धनाजी निकम, किरण निकम, विष्णू कारंडे, बदाम पारखे, उमाजी फाटक व कर्मचारी उपस्थित होते.