पीएम किसान पात्र लाभार्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएम किसान पात्र लाभार्थी
पीएम किसान पात्र लाभार्थी

पीएम किसान पात्र लाभार्थी

sakal_logo
By

02127
सावर्डे दुमाला : येथील शेतकऱ्यांना पात्र ठरविल्यानंतर मनसेच्या वतीने नामफलकाचे अनावरण करून आनंदोत्सव साजरा केला.
...

मनसेच्या आंदोलनानंतर
सावर्डेतील १२ शेतकरी पात्र

शिरोली दुमाला, ता. ३ : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील पीएम किसान योजनेमधील १२ शेतकऱ्यांना पात्र ठरवण्याचा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतर मनसेच्या वतीने नामफलकाचे अनावरण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पी.एम. किसान योजनेत येथील १२ शेतकरी पात्र असताना देखील महसूल विभागाकडून त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. या शेतकऱ्यांना २००० रुपयेचा हप्ता मिळत नव्हता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन केले होते. याची दखल घेत या शेतकऱ्यांना पात्र ठरवून पी. एम. किसान योजनेचा लाभ देण्याचे आदेश प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी करवीर महसूल विभागाला दिला. यामध्ये कृष्णात भोसले, कुंडलिक निकम, धनाजी भोसले, मदन कारंडे, कृष्णात खाडे, निवृत्ती कारंडे, शामराव कारंडे, मारुती निकम, नामदेव कारंडे, पंडित कारंडे, नवनाथ निकम, कृष्णात सुर्वे या शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासाठी मनसे संघटनेचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, अमित पाटील, निलेश धुम्मा, अभिजित पाटील, प्रसाद पाटील, नवनाथ निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.