
व्हन्नूर सेवा संस्था चेअरमन निवड बातमी
२१४३, ४४
संजय लोंढे अध्यक्षपदी
सिद्धनेर्ली ः व्हन्नूर (ता. कागल) येथील हनुमान विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी संजय लोंढे यांची, तर बाळू यादव यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी ए. पी. खामकर होते. अध्यक्षपदासाठी मुश्रीफ गटाच्या लोंढे विरुद्ध राजे गटाचे नेताजी मोरे यांच्यात दुरंगी लढत झाली. राजे गटाच्या आठ सदस्यांच्या पाठिंब्याने लोंढे यांनी मोरे यांना नऊविरुद्ध चार मतांनी मात दिली. उपाध्यक्षपदासाठी राजे गटाच्या यादव व मुश्रीफ गटाच्या दादासो चौगुले यांच्यात दुरंगी लढत झाली. राजे गटाचे आठ व मुश्रीफ गटाचा एक अशा नऊ विरुद्ध चार मतांनी यादव विजयी झाले. ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांचे समर्थक नेताजी मोरे यांची सत्ता संपुष्टात आली होती. तेरा जागांपैकी नऊ जागांवर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटांपैकी एक गट, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाच्या आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते. चार जागांवर मुश्रीफ, खासदार मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे गटाच्या आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Sdr22b01636 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..