सिद्धनेर्लीत कब्बडी स्पर्धा बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धनेर्लीत कब्बडी स्पर्धा बातमी
सिद्धनेर्लीत कब्बडी स्पर्धा बातमी

सिद्धनेर्लीत कब्बडी स्पर्धा बातमी

sakal_logo
By

सिद्धनेर्लीत आजपासून
महिला, पुरुष कबड्डी स्पर्धा

सिद्धनेर्ली, ता. २९ ः येथे सोमवार (ता. ३०) ते मंगळवार (ता. ३१) या दरम्यान राज्यस्तरीय निमंत्रितांच्या कबड्डी स्पर्धा महिला व पुरुष अशा दोन गटांत प्रकाशझोतात होणार आहेत. सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केले आहे. स्पर्धेत तुषार पाटील, आनंद पाटील (दोघेही सडोली), ऋतुराज कोरवी (शिरोली), अक्षय जाधव (आणाजे), सौरभ पाटील (कौलव), आनंद पाटील (तळसंदे) समृद्धी बनसोडे (कोल्हापूर), नंदिनी झेंडे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शीला लुगडी, आदित्य शिंदे या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील तसेच प्रो कबड्डी स्पर्धेतील खेळाडू खेळणार आहेत. दोन्ही गटांतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या संघांना रोख रक्कम व सरपंच चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, दोन्ही गटांमध्ये सामनावीर व मालिकावीर अशी स्वतंत्र बक्षिसे आहेत. येथील गाव तलावातील श्री दत्त उद्यानात महिला व पुरुष गटासाठी स्वतंत्र मॅटवर या स्पर्धा होतील. बैठक व्यवस्थेसाठी सुसज्ज गॅलरीची व्यवस्था केली आहे. महिलांसाठी त्यामध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे. सायंकाळी चार ते रात्री दहा या वेळेत स्पर्धा होईल. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Sdr22b01649 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top