
स्वप्निल माने सत्कार बातमी
02220
सिद्धनेर्ली ः येथे स्वप्नील माने यांच्या सत्कारावेळी माजी प्राचार्य जीवन साळुंखे व इतर.
अपयश आले तरी खचून
जाऊ नका ः स्वप्नील माने
सिद्धनेर्ली, ता. २३ ः स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अपयश आले तरी खचून जाऊ नका. पुन्हा प्रयत्न करा. यशस्वी होईपर्यंत मोबाईल, टीव्हीपासून लांब राहा. त्यातूनही अपयश आले तर बी प्लॅन करा. मी जर यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालो नसतो तर चहाही विकण्याची तयारी ठेवली होती, असे यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या स्वप्नील माने यांनी सांगितले.
येथील राजर्षी शाहू अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी प्राचार्य जीवन साळुंखे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते माने व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी सरपंच एम. बी. पाटील होते.
दरम्यान, शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर व नागरिकांनी माने यांना शुभेच्छा दिल्या. बामणी येथेही भीमराव शिंदे व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी लक्ष्मण पाटील, एस. एल. पोवार, मधुकर येवलुजे, विलास पोवार उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अशोक पोवार यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. विजय मोरबाळे यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. सविता खोत यांनी केले. आभार पूजा पोवार यांनी मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Sdr22b01678 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..